30.9 C
New York
Sunday, August 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिक्षकांना बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम नोंद करण्याची सुविधा उपलब्ध

शिक्षकांना बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम नोंद करण्याची सुविधा उपलब्ध

शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांची माहिती

कोल्हापूर/ प्रतिनिधी

शिक्षक बदली प्रक्रिया 2025 अंतर्गत बदली अधिकार पात्र शिक्षकांचा टप्पा क्रमांक 5 पूर्ण होवून बदलीस पात्र राउंड-२ (टप्पा क्रमांक ६) साठी शिक्षकांना बदली करीता शाळांचा प्राधान्यक्रम नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथ) डॉ. मीना शेंडकर यांनी दिली आहे.

ग्रामविकास विभाग यांच्याकडील १८ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची ऑनलाईन पध्दतीने बदली प्रक्रीया सुरु झाली आहे. बदलीस पात्र (टप्पा क्रमांक ५) मधील शिक्षकांना ५ ते १० ऑगस्ट २०२५ अखेर बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम नोंद करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. या कालावधीत ज्या शिक्षकांची बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांची बदली झालेली आहे, अशा शिक्षकांची यादी या कार्यालयाकडून १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार बदलीस पात्र राउंड-२ (टप्पा क्रमांक ६) मधील शिक्षकांना  १५ ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम नोंद करण्यासाठी सुविधा उपलब्ध असेल. या संवर्गातील पात्र शिक्षकांना आवश्यक असलेली सुधारित रिक्त पदांची यादी दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीनवरुन प्रसिध्द करण्यात आलेली असून ही यादी सर्व शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या लॉगीन वरुन पाहता येईल.

१५ ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आपल्या गटाकडील बदलीस पात्र राउंड-२ मधील सर्व पात्र शिक्षकांना त्यांच्या लॉगीनवरुन बदली करीता शाळांचा प्राधान्यक्रम काळजीपूर्वक निवडण्याबाबत सूचित करावे. दिनांक १८ ऑगस्ट २०२५ नंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही तसेच सदरचा प्राधान्यक्रम निवडणे ही संबंधित शिक्षकांची जबाबदारी असल्यामुळे या प्रक्रीयेमध्ये कोणत्याही प्रकारची चुक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षकांची असेल. बदलीस पात्र राउंड-२ (टप्पा क्रमांक ६) मधील पात्र शिक्षकांनी बदलीसाठी पर्याय निवडल्यानंतर निवडलेल्या पर्यायांची पडताळणी व आपला अर्ज अंतिम करुन ऑनलाईन पोर्टलवर सबमिट झाल्याची खातरजमा करावी तसेच अंतिम केलेल्या अर्जाची हार्डकॉपी जतन करुन ठेवावी. असे आवाहन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!