कोल्हापुरात पावसाची जोरदार बॅटिंग
– राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे खुले
— राधानगरी, गगनबावडा, शाहुवाडीमध्ये मुसळधार
— पंचगंगा पातळी तीस फुटांवर
– 11धरणे ओव्हर फुल्ल,
-45 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर/प्रतिनिधी
जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार आगमन केले आहे. दोन दिवस रेड अलर्ट आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाची बॅटिंग सुरू होती. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
कोल्हापुरात 15 जुलैपासून पावसाने उघडीप घेतली होती. दोन दिवसापासून मात्र पावसाचा जोर पुन्हा सुरू झाला आहे. सोमवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला. धरण क्षेत्रासह अन्य ठिकाणी पावसाचा जोर कायम होता. रविवारपासून 48 तासात जिल्ह्यात सरासरी 31.5 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गगनबावडामध्ये सर्वाधिक 94 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर शाहूवाडी 58, राधानगरी 46, कागल 39, भुदरगड 53 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
राधानगरीची सर्व सात दरवाजे उघडले आहेत. 11500 क्युसिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी लगत गावाना सतर्क राहण्याचां इशारा दिला आहे. पंचगंगा नदीची पाण्याची पातळी तीस फुटांवर गेली आहे. 45 बंधारे पाण्याखाली आहेत.
अलमट्टी धरणातून एक लाख क्युसिक विसर्ग
कोल्हापूर व सांगलीमध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. अलमट्टी धरणातून विसर्ग ही वाढविण्यात आला आहे सोमवारी एक लाख क्युसिक विसर्ग सुरू आहे.
…………………..
20 ऑगस्ट पर्यंत पावसात जोर राहणार कायम
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रविवारपासून दोन दिवस रेड अलर्ट आहे. तर मंगळवार आणि बुधवारी ऑरेंज अलर्ट असणार आहे. गुरुवार पासून पावसात जोर कमी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
…….