20.5 C
New York
Monday, August 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

सर्किट बेंचच्या उद्घाघाटनासाठी राबले महापालिकेचे हजारो हात

सर्किट बेंचच्या उद्घाघाटनासाठी राबले महापालिकेचे हजारो हात

— सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून मनपा प्रशासकांचे कौतुक

कोल्हापूर/प्रतिनिधी

कोल्हापूर शहरातील नव्या सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी महापालिकेने गेल्या आठ दिवसांत मोठी तयारी केली. स्वच्छता, रस्त्यांचे डांबरीकरण, सुशोभीकरण, अतिक्रमण कारवाई, पॅचवर्क अशी विविध कामे यावेळी हाती घेण्यात आली. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आहोरात्र राबले.

या कामांतर्गत सी.पी.आर. सिग्नल चौक ते तहसिलदार कार्यालयापर्यंतचा रस्ता, खानविलकर चौक, अदित्य कॉर्नर, धैर्य प्रसाद चौक, ताराराणी चौक या ठिकाणी पेव्हर पद्धतीने डांबरीकरण करण्यात आले. सर्किट बेंच परिसरात काँक्रिटीकरण, गटर्सची कामे तसेच क्रांती उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले. येथे असलेले कारंजे विविध रंगांमध्ये पुन्हा सुरू करण्यात आले.
————-
सर न्यायाधीश गवई यांनी केले महापालिकेचे कौतुक

सर्किट बेंच साठी आठ दिवसात सर्व कामांवर महापालिकेने तब्बल 60 लाखांचा खर्च केला. यामध्ये सीपीआर चौकातील क्रांती उद्यानाचे सुशोभीकरण व आकर्षक कारंजाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या भाषणामध्ये विशेष कौतुक केले.
————–
140 डिजिटल बोर्ड हटवली
शहरात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक, रस्ता दुभाजक बसविण्यात आले. विद्युत विभागाने मुख्य मार्गावरील 180 स्ट्रीटलाईट्स दुरुस्त करून कार्यान्वित केल्या. उद्यान विभागाने मुख्य रस्ते व कार्यक्रमस्थळ परिसरातील झाडांची छाटणी केली. अतिक्रमण विरोधी पथकाने विविध चौकांतील 140 लहान डिजिटल बोर्ड, 70 झेंडे, तसेच 8×8 आकाराचे 2 डिजिटल बोर्ड जप्त केले. अग्निशमन विभागाकडून सुरक्षेसाठी सर्किट हाऊस, वन विभाग कार्यालय, मेरी वेदर ग्राऊंड, नवे सर्किट बेंच व शाहू समाधी स्थळ येथे अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या.

१० टनांपर्यंत कचरा उठाव

या निमित्ताने आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील मुख्य रस्त्यांची, व्हीआयपी मार्गाची स्वच्छता करुन 10 टनांपर्यंत कचरा उठाव केला. शहरातील सर्किट बेंच परिसर, शाहू समाधी, ताराराणी पुतळा, शिवाजी विद्यापीठ रोड, न्यायमूर्तींचे निवासस्थान, सयाजी हॉटेल परिसर इथलीही स्वच्छता करण्यात आली. तसेच 100 पेक्षा अधिक मॅनहोल चेंबर साफ करण्यात आले. मोकाट जनावरे व कुत्र्यांनाही पकडण्यात आले. या कामासाठी आरोग्य विभागाचे तब्बल 1000 कर्मचारी तैनात होते.

महापालिकेतील अधिकाऱ्यांसह हजारो कर्मचाऱ्यांचे संयुक्त प्रयत्न

ही सर्व कामे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त कपिल जगताप, परितोष कंकाळ, सहा.आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उप-अभियंता सुरेश पाटील, महादेव फुलारी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, कामगार अधिकारी राम काटकर, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, सहा. अभियंता विद्युत नारायण पुजारी, अमित दळवी तसेच कनिष्ठ अभियंता व विविध विभागातील हजारो कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरीत्या पार पडला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!