कोल्हापूर शहरातील मांस विक्री, कत्तलखाने बुधवारी बंद
कोल्हापूर/ प्रतिनिधी
जैन धर्मीयांचा महत्वाचा धार्मिक सण पर्युषण पर्व यावर्षी श्रावण वद्य द्वादशी, बुधवार 20 ऑगस्ट 2025 रोजी साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या परिपत्रकानुसार कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील सर्व मटण, मांस व चिकन दुकाने 20 ऑगस्ट रोजी बंद ठेवावीत असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
———-