कोल्हापूर शहरातील विद्रूपीकरण थांबवा
माजी महापौर निलोफर आजरेकर यांची मागणी
कोल्हापूर/ प्रतिनिधी
महापालिकेकडून झाडांची छाटणी केल्यानंतर पडलेल्या फांद्यांचा उठाव आठ दिवस झाले तरी होत नाही. रस्त्यावरील खरमातीही अनेक दिवस पडून राहते यामुळे शहरात विद्रोपीकरण होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तात्काळ अशा प्रकारे होणारे विद्रोपीकरण तात्काळ थांबवावे अशा मागण्याची निवेदन माझी महापौर निलोफर आजरेकर यांनी प्रशासक के मंजू लक्ष्मी यांना दिले आहे.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे, 42 वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश येऊन कोल्हापूर येथे उच्च न्यायालय यांचे सर्किट बेंच सुरू झाले आहे. तसेच श्री क्षेत्र अंबाबाई मंदिराच्या लाखो भाविकांच्या मुळे कोल्हापूरच्या पर्यटनाची तसेच शहराच्या आर्थिक उत्पन्नाचे खूप मोठे स्त्रोत्र निर्माण झाले आहे. रोज हजारो पर्यटक तसेच भाविक कोल्हापूर शहराला येत आहेत . परंतु महापालिकेच्या व एमएसईबी (MSEB) च्या काही असवेदनशील अधिकाऱ्यांमुळे कोल्हापूरच्या सौंदर्याला गालबोट लागत आहे. मी कित्येक वर्षापासून बघत आहे की पावसाळ्याच्या पूर्वी किंवा पावसाळ्यात एमएसईबीकडून किंवा महापालिका प्रशासनाकडून कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्त्यावरील विद्युत वाहिनी बाजू असलेल्या वृक्षांचे फांद्या छाटण्यात येतात. ते तेथेच रस्त्यावर फेकले जातात. परंतु दोन्ही खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयक साधून स्मार्ट वर्क करून एकाच वेळी फांदी छाटणे तसेच महापालिकेचा डंपर त्याचवेळी उपस्थित ठेवून ही स्वच्छता करणे हे योग्य आहे. परंतु असे होत नाही. त्यामुळे पालापाचोळा व कचऱ्याचे ढीग ताबडतोब उचलण्याचे आदेश व्हावेत. त्याचबरोबर कोल्हापूर वासियांचे देखील जबाबदारी वाढलेली असून रस्त्यावर उघड्यावर कचरा,प्लास्टिक, खराब साहित्य, खरमाती न टाकता, महापालिकेने केलेल्या विविध पर्यायांचा वापर करून आपली करवीर नगरी स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी केले आहे.
………………….
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा
फाद्यांची छाटणी केल्यानंतर पालापाचोळा आठ- पंधरा दिवस रस्त्यावर पडून राहतो. यामुळे शहर विद्रोपीकरणाचे मुख्य कारण बनले जाते. तरी आपण अशा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ही माजी महापौर आजरेकर यांनी केली आहे.
…….
.