तळ कोकण व गोव्याला जाण्यासाठी केवळ आंबोली मार्गे वाहतूक सुरू
कोल्हापूर/प्रतिनिधी
तळकोकण व गोवा या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या तीन मार्गांपैकी सध्या केवळ आंबोली घाटमार्गे वाहतूक सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी आज दुपारी एक च्या सुमारास दिली .
ओरोस अर्थात सिंधुदुर्गात जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे भुईबावडा तसेच करूळ घाट होय . तथापि गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत . त्याचबरोबर दुसरा मार्ग म्हणजे राधानगरी तालुक्यातील फोंडा घाट .या मार्गावरील देवगड निपाणी रोडवरील फेजिवडे येथील कब्रस्तान जवळ पुराचे पाणी आल्याने तो ही मार्ग ,पर्यायाने घाट बंद असल्याचे त्यांनी सांगितले . त्यामुळे केवळ आंबोली मार्गेच तळकोकण व गोव्याकडे जाता येईल याची संबंधित नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे .