स्नेहल करपे यांना छत्रपती शिवाजी विद्यापीठाची पीएचडी
वाकरे : प्रतिनिधी
येथील कु. स्नेहल महादेव करपे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांनी “Impact of Agricultural Practices on Drinking Water Quality in Kumbhi River Basin: A Geographical Analysis” (कुंभी नदी खोऱ्यातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर कृषी पद्धतींचा परिणाम : एक भौगोलिक विश्लेषण) या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. या संशोधनासाठी त्यांना राजाराम महाविद्यालय, कोल्हापूरचे भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. राजेखान शिराज शिकलगार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. अनिता बोडके यांचे प्रोत्साहन, तसेच शिवाजी विद्यापीठ भूगोल विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एस. पन्हाळकर व प्राध्यापक वृंद यांचे सहकार्य मिळाले.
स्नेहल करपे यांनी शिवाजी विद्यापीठातून भूगोल विषयात एम.ए. पदवी, तर महावीर महाविद्यालयातून बी.ए. व बी.एड. पदवी संपादन केली आहे. प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत, तर माध्यमिक शिक्षण शंकर तोडकर हायस्कूल, वाकरे येथे पूर्ण केले.
संशोधनासाठी त्यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांची शिष्यवृत्ती मिळाली.
वाकरे येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील स्नेहल ने जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या परिसरातीलच कुंभी नदी खोऱ्यातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर कृषी पद्धतींचा परिणाम : एक भौगोलिक विश्लेषण या विषयावर संशोधन करून करून पीएचडी संपादन केल्याबद्दल गावातील विविध संस्था ग्रामस्थ व नातेवाईक मित्र परिवाराकडून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे .