जि प सोसायटीचे अध्यक्षपदी श्रीकांत चव्हाण, उपाध्यक्षपदी रवींद्र जरळी
कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्रीकांत नारायण चव्हाण व व्हा. चेअरमनपदी रविंद्र करबसाप्पा जरळी यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी उपनिबंधक उदय उलपे होते. चेअरमन पदासाठी श्रीकांत चव्हाण यांना सूनिल पाटील सुचक व अमर पाटील यांनी अनुमोदन दिले तसेच व्हा. चेअरमन पदासाठी रविंद्र जरळी यांना साताप्पा मगदूम सुचक व मुजम्मिल नावळेकर यांनी अनुमोदन दिले.
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने सहकारामधील दिपस्तंभ व उल्लेखनिय कारभाराबाबत नावलौकीक प्राप्त केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची मातृसंस्था असलेल्या या संस्थेने जिल्हा परिषदेतील अनेक विभागातील कर्मचारी यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक उत्कर्ष करण्यामध्ये या संस्थेने नेहमीच मोलाचा हातभार लावलेला आहे. अशा या संस्थेने चांगल्या प्रकारे आर्थिक गरुड झेप घेतली असून संस्थेच्या सभासदांचे हिताचे काम करणेस आम्ही सर्व संचालक व सुकाणू समिती कटिबद्ध आहोत. भविष्यात संस्थेच्या नावलौकीकात भरीव वाढ करणेकामी निश्चीत नियोजनबद्द काम करणेची ग्वाही दिली तसेच यापुढेही संस्थेचा कारभार सुकाणू समितीच्या मार्गदर्शनानुसार व सर्व संचालकांच्या सहकार्याने सभासदांच्या हिताचा व पारदर्शकपने, काटकसरीने करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणार असलेचे नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी निवडीच्या वेळी सांगीतले.
निवडीवेळी संचालक सुनिल पाटील, साताप्पा मगदूम, सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, रणजित पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, अजय शिंदे, संजय शिंदे, बाजीराव पाटील, सरदार दिंडे, नंदिप मोरे, जयकुमार रेळेकर, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव.तज्ञ संचालक – दिलीप पाटील, दिपक बुरूड, संस्थेचे मार्गदर्शक एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकुरे, एम.एम. पाटील, के. आर. किरुळकर, राजाराम वरुटे, राजीव परीट, रविकुमार पाटील, मनोहर भाट, सात्ताप्पा मोहिते, अजित मगदुम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदुम, दगडू परीट, उपस्थित होते.