अलमट्टीतून तब्बल एक लाख 75 क्युसेक विसर्ग
– महाराष्ट्र व कर्नाटक प्रशासनाचां समन्वय, -अलमट्टीच्या पाणी पातळीवर पाटबंधारे विभागाच्या नजरा
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. पूरस्थिती नियंत्रण राहण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र शासनाचां कर्नाटक प्रशासनासोबत समन्वय साधला जात आहे. सोमवारी अलमट्टी धरणातून एक लाख क्युसिक विसर्ग सुरू होता.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसात जोर कायम असल्याने बहुतांशी धरणातून विसर्ग मोठ्या संख्येने होत आहे त्यामुळे मंगळवारी अलमट्टी धरणातून 75000 क्युसेक विसर्ग वाढवण्यात आला आहे. दुपारनंतर एक लाख 75 हजार विसर्ग सुरू होता. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यामध्ये स्वतः लक्ष घातले आहे. सांगली पाटबंधारे विभागाचे अभियंता 24 तास तीन शिफ्ट मध्ये अलमट्टी धरणाच्या ठिकाणी ठाण मांडून आहेत.