अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे 139 शाळा बंद
— प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांची माहिती
कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे भुदरगड तालुक्यातील 9, गगनबावडा 46, करवीर 5, पन्हाळा 34 राधानगरी 30 व शाहूवाडी तालुक्यातील 15 अशा एकूण 139 शाळा बुधवारी बंद ठेवण्यात आल्या.. याबाबत जिल्हा स्तरावरुन वारंवार आढावा घेतला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली आहे.
बंद असलेल्या शाळांची माहिती
भुदरगड- एकूण शाळा- 233, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 9, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 9
गगनबावडा – एकूण शाळा- 237, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 44, माध्यमिक 2
करवीर- एकूण शाळा- 355, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 5, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 5
पन्हाळा- एकूण शाळा- 320, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 34, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 34
राधानगरी – एकूण शाळा- 280, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 30, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 30
शाहुवाडी-एकूण शाळा- 322, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 15, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 15
शिरोळ – एकूण शाळा- 304, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 0, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 0
एकूण शाळा– 3684, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 137, माध्यमिक 2, एकूण बंद असलेल्या शाळा- 139 शाळा बंद.