आरटीओकडून अटकावून ठेवलेल्या 27 वाहनांचा लिलाव
कोल्हापूर/प्रतिनिधी
: प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने विविध गुन्ह्यामध्ये अटकावून ठेवलेली वाहने एस. टी. डेपो संभाजीनगर येथे ठेवली आहेत. या अटकावुन ठेवलेल्या 27 वाहनांचा (MSRTC व्दारे) लिलाव करावयाचा आहे. लिलाव प्रक्रीया शासन निर्णयानुसार करण्यात येणार आहे. लिलाव प्रक्रीया (एम एस आर टी सी ) या कंपनी मार्फत होणार आहे. तसेच हा लिलाव राज्य शासनाच्या देखरेखखाली होत आहे, अशी माहिती सहा. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही वाहने गेली कित्येक वर्षे अटकावुन ठेवली अजुन वाहन मालक खटला विभागातील दंड व थकीत कर भरत नसल्याने वाहने खराब व सडलेल्या अवस्थेत आहेत. वाहन मालक नोटीसा पाठवुन देखील कोणताही प्रतिसाद देत नाहीत. अटकावुन ठेवलेल्या वाहन मालक धारकांना तसेच बँकांना सुचीत करण्यात येते की आपली वाहने खटला विभागातील दंड व थकीत कर भरुन सात दिवसाच्या आत आपली वाहने ताब्यात घ्यावी अन्यथा सात दिवस पूर्ण झाल्यानंतर वाहन मालकांची व बँक धारकांच्या कोणत्याही तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.
लिलाव करावयाच्या वाहनांचे वाहन क्रमांक
MH09U-6121 (2) MH10AW-0448 (3) MH09J5294 (4)MH09BC-3172 (5)MH09J-6073 (6)MH09J-5362 (7) MH09J 4394 (8)MH09J-9133 9)MH09AB-0763 (10)MH09J-5565 (11) MH09J-1366 (12) MH09J-4705 (13) MH09J-6705 (14) MH09J-5552 (15) MH09J-5257 (16) MH09J-2017 (17) MH09A-2511 (18) MH09CU-4423 (19) MH04E-6827 (20) MH43E-3549 (21) MH09J-3355 (22) MH09Q-1644 (23) MH09J-1532 (24) MH09Q-2668 (25) MH09EL-0062 (26) MH42B-0798 (27) MH04E-6827 अशी एकूण 27 वाहने आहेत.