लोणीकंद : वाघोली (ता हवेली ) येथे बुधवारी दुपारी दीडच्या वाजण्याच्या सुमारास खुनाचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे, एका अल्पवयीन मुलाने दगडाने ठेचून एका व्यक्तीचा खुन केला. मद्याच्या नशेत एका व्यक्तीने वडिलांना टकल्या म्हणण्याचा राग आल्याने या अल्पवयीन तरुणांनी हे कृत्य केले. राजू लोहार (वय ४६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर १६ वर्षीय अल्पवयीन आरोपी वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्ती व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वाघोलीतील दरेकर वस्ती परिसरात ते राहतात. दरम्यान काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोघेही मद्य प्राशन करत बसले होते. त्यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला.
आणि मयत राजू लोहार या व्यक्तीने आरोपी यांना उद्देशून तुझा बाप टकल्या असे म्हंटले. त्याचा राग धरून आरोपी अल्पवयीन तरुणाने आरोपीला मारहाण करण्यास सुरुवात केली. शेजारीच पडलेला भला मोठा दगड उचलून आधी पाठीत नंतर छातीवर टाकला. दगडाचा वार वर्मी लागल्याने राजू लोहार यांचा मृत्यू झाला. वाघोली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.