11 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

पत्रकार संघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी एकनाथ थोरात 

पत्रकार संघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी एकनाथ थोरात 
शिरूर : राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या अध्यक्षपदी एकनाथ पाराजी थोरात रा.गुनाट यांची एकमताने निवड करण्यात आली.निवडीचे पत्र त्यांना संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजयराव लोखंडे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी शिरूर तालुक्यातील कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली,ती अनुक्रमे शुभम बाळू वाकचौरे (उपाध्यक्ष), आकाश उत्तम वडघुले (उपाध्यक्ष) सुधीर साहेबराव खोमणे (कार्याध्यक्ष) अल्लाउद्दीन हुसेन अलवी (सचिव) जयवंत बाबाजी पडवळ (खजिनदार) प्रदीप मळीभाऊ रासकर ( संपर्कप्रमुख)  बाळासाहेब जाधव (शहर प्रमुख) दत्तात्रय कर्डिले (समन्वयक) संदीप ढाकुलकर (संघटक) रमेश मनोहर बनसोडे (संचालक) यावेळी जिल्हा कार्यकारी मंडळातील अध्यक्ष प्रा.सचिन माथेफोड, उपाध्यक्ष विजय थोरात,कार्याध्यक्ष सचिन सुंबे,सल्लागार भाऊसाहेब महाडिक, पुणे विभागीय संपर्कप्रमुख शंकर पाबळे, संचालक पोपट मांजरे तसेच संघटनेतील पदाधिकारी व जिल्ह्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

एकनाथ थोरात यांनी आपल्या लेखणीतून अनेक सामाजिक समस्या उघड करून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे.पत्रकारिता करत असताना सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवला आहे.गोरगरीब मुलांना शालेय साहित्य वाटप असो,कोरोना काळात अनेक रुग्णांना पत्रकारांनी मदत केली आहे.तसेच रुग्णानां सहाय्यता करण्यासाठी हे पत्रकार नेहमी तयार असतात.या निवडीबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!