लोणीकंद : संदीप हरगुडे या तरुणाला रुग्णवाहिकेतून व्यसनमुक्ती केंद्रात नेत असताना त्याला नेवू नये यासाठी विशाल कोलते याने विरोध केला, परंतु तो जाण्यासाठी तयार होत नसल्यामुळे विशाल कोलते यांनी त्यांचे परवानाधारक रिव्हॉल्व्हर मधून हवेत एक गोळी फायर केल्याची घटना वाघोलीमध्ये घडली असून त्यानंतर रुग्णवाहिकेवर दगड मारून रुग्णवाहिकेची काच फोडली यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून विशाल कोलते याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोघेही तरुण दारूच्या नशेत होते, या सर्व प्रकरणानंतर वाघोली मधील परिस्थिती शांत असून रुग्णवाहिका पेटवली खून झाला ही अफवा पसरविण्यात आली असून नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच या पुढील काळात शस्त्र परवाने देताना कागदपत्रांची नीट तपासणी करून शस्त्र परवाना देण्यात यावे असे आवाहन माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी केले आहे.
यापूर्वी अशाप्रकारे तक्रार सुद्धा मा.पोलिस संचालक महाराष्ट्र राज्य यांचेकडे केली आहे .पुणे पोलीस आयुक्त यांचेकडून २०२१/२२ ला दिलेल्या सर्व शस्त्र परवाना धारकांची कागदपत्रे तपासण्याची गरज असल्याचे वारघडे यांनी सांगितले.